नोकरीचं ठिकाण, कुमठेकर रोड (लक्ष्मी रोडचा जुळा भाऊ ‘खरेदीदारांसाठी’) पार्किंगच दिव्य तिथे गाडी लावणाऱ्यालाच माहित.
अशातच सम आणि विषम तारखांचा मेळ बसवत सकाळी लवकर दुचाकी पार्क केली कि तिचे दर्शन डायरेक्ट संध्याकाळीच. उशिरा ऑफिसातून खाली आलो आणि गाडी काढायला लागलो तर हेडलाईटचे पूर्ण कव्हर कोणी महाभागाने तोडून टाकले होते. थोडी जागा मिळाली असेल आणि त्या जागेच स्वतःची दुचाकी कशीबशी लावली असेल (मुंबईच्या ट्रेन मध्ये कसे एकमेकांना चिटकून एकमेकांच्या काखेतल्या घामाचा वास घेत कसेबसे उभे असतात तशीच अवस्था दुचाकींची लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोडवर होते) नंतर गाडी काढताना गाडीचे हेन्डेल माझ्या दुचाकीच्या कव्हर मध्ये अडकून ते तुटून पडले असणार. प्रचंड संताप आला एक तर दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना (हा दर महिन्याला येतच असतो, पण का?). नेहमी गाडी स्वच्छ ठेवणारा त्यात दुचाकीचा दर्शनी भागच तुटलेला असल्यामुळे गाडीची शान कमी होत होती. खूपच अपसेट झालो, मनातल्या मनात शिव्यांच्या लाखोल्या वहिल्या. गाडीच्या समोर उभा राहून पाहिलं, तर एखाद्या सुंदर मुलीच्या चेहर्यावर एखादा डाग असेल तर कशी हळहळ वाटते (म्हणजे आपल्याच मनातल्या मनात...जाहीररीत्या व्यक्त्य झाल्यास काय होईल?... हळहळ नाही म्हणत ‘ती’ व्यक्त झाली तर काय होईल हे म्हणतोय).
थोडं निरखून पाहिलं, आता तुटलेला कव्हर दिसत नव्हता तर त्याच्या आतमध्ये साठलेली धूळ दिसत होती. गाडी नेहमी प्रमाणे स्वच्छ दिसत होती पण बाहेरूनच, फक्त आतमध्ये असणारी धूळ आत्ता दिसत होती, तेही कव्हर तुटल्यामुळे. माणसाचे मन पण असेच असतं ना?
वरून कितीही चांगला दिसणारा माणूस ‘आतमधून’ कधीच कळत नाही. किंबहुना दिसतच नाही, दिसते ते फक्त बाह्यांग, रंगवलेलं. तोंडावर चांगला बोलणारा आतून देखील तितकाच चांगला चिंतणारा असेल याची खात्री साक्षात परमेश्वर देखील देवू शकत नाही तर तुमचे आमचे काय. विश्वासातल्या माणसाने तुमचे मन दुखवावे आणि त्याच्या मनात तुमची असलेली त्याच्या दृष्टीने तुमची खरी प्रतिमा काय आहे हे दाखवावे मग तुमची अवस्था काय होईल? अरे, हा माझ्या बद्दल नेहमी चांगला बोलणारा आज असा कसा काय बोलला. तुम्ही कोलमडून पडता कारण ज्याला तुम्ही अगदी जवळचा मानत असता त्याच्या मनातले तुम्ही जाणूच शकलेला नसता. म्हणजे तुम्ही त्याचे फक्त बाह्यांग पाहिलेलं असतं.
आणि त्यातल्या त्यात दुसऱ्याला दुखावणारी ती व्यक्ती आपणच असेल तर?
आता माझ्या दुचाकीचे कव्हर तोड्नारयाचे आभार मानावेसे वाटतात, खूप चांगली शिकवण देवून गेल्यामुळे. कव्हर काय कधीही बसवू पण त्याआधी आतली धूळ कधी जमा होणार नाही याची काळजी घेवून...धूळ, आपल्या मनातली.
-सुरेश सायकर

No comments:
Post a Comment