Friday 25 October 2013

खंत ...


काही तरी कारणाने मूड खराब झाला होता. डोक्यातून काही केल्या तो विषयच जात नव्हता. मार्केटयार्ड मधून जाताना थोडी कसरतच असते ट्रक रस्त्यावरच उभे केलेले असतात आणि अशातच साधारण १२ ते १४ वर्ष वयोगटातील दोन मुले रस्ता ओलांडत होते. मी माझ्या विचारात आणि ते त्यांच्या आनंदात आणि इतक्यात दोघांपैकी एकजण  पुढे जाता जाता एकदम  थांबला हे अचानक घडल्यामुळे मी विचारातून भानावर येईपर्यंत आणि त्याला वाचवायला गाडी बाजूला घेईपर्यंत तो मुलगा गाडीवर आदळला स्वतःला लागू  म्हणून डिफेंस मोड मध्ये त्याने त्याचा हात गाडीच्या हेडलाईट वरील पेनेलला लावला. मागचा पुढचा विचार न करता मी  खाड्कन त्याच्या थोबाडीत लगावली. ते एकदम कोमजलच....ते एवढंसं बारकं माझ्या फटक्याने कळवळलं...निरागसपणे माझ्या डोळ्यात बघत होतं...बहुतेक त्याला सांगायचं असावं की तू गाडी चालवताना विचाराच्या  तंद्रीमध्ये चाललेला होतास आणि निट लक्ष नाही असं वाटून मी अचानक थांबलो होतो. त्याच्या कानाखाली लावल्यावर देखील मी त्याला बडबड करतच होतो. तरीही तो शांतपणे गालावर हात घट्ट धरून रस्ता ओलांडत होता. त्याचा मित्र त्याच्या हाताला धरून त्याला घेवून जात होता. मला वाटल शेजारच्या झोपडपट्टी मधली मुलं असतील आणि छोटी असल्यामुळे मारू न शकणारी मला कमीतकमी  शिव्या घालून तरी जातील पण असं काहीच घडलं नाही. बहुतेक  बाजूला असणाऱ्या एखाद्या हॉटेल मधली कामगार असावीत ....

राग शांत झाल्यावर मलाच नंतर अपराध्यासारख वाटायला लागलं आणि ठरवलं कि त्याला भेटून त्याची माफी मागायची. काहीही कारणाने त्याला हसवायचं जेणेकरून तो कालचा प्रकार विसरून जाईल. रोज येताना त्या ठराविक भागामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न केला, तिथल्या हॉटेलमध्ये पण विचारून पाहिलं पण तो मुलगा परत कधीच दिसला नाही. मनमोकळ्यापणाने माफी मागायची होती ती खंत मनामध्ये तशीच राहिली.    

बरीच वर्षं  उलटून गेलीत या घटनेला त्याचा चेहरा सुद्धा नीट आठवत नाही आठवतात ते फक्त त्याचे डोळे...पाण्याने भरलेले. त्यादिवशी तो ज्या निरागसपणे माझ्याकडे बघत चाललेला होता त्याच्या डोळ्याला डोळा भिडवणे पण मला शक्य होत नव्हतं. रात्रभर बहुतेक झोपलंच नसावं, कळवळला असेल खूपच, त्याच्या आईला सांगितल्यावर तिने माझ्या नावाने कडाकडा बोटं मोडली असतील. रात्रभर सुजलेल्या गालावरून अश्रू ओघळले असतील, ती रात्र  तळमळत जागूनच काढली असेल त्याने  आणि  त्या दिवसापासून मात्र माझी झोप उडालेलीच आहे... कायमची                   

Friday 18 October 2013

!!! बहते हुए सूखे जख्म !!!!

हर शाम की तरह वो भी इक रंगीन शाम थी,
हर चेहरे पर मुस्कान फ़ैली थी,
खिलखिलाते, मासूमियतसे भरे जिन्दगीका लुत्फ़ उठा रहे थे,
हर कोई एकदूसरेको हँसा रहा था,
उस रेस्तोरां का माहौल हर रोजक़े शाम जैसा ही था.....

लेकिन,आज की शाम, हर शाम जैसी नहीं थी उन दोनों के लिए,
कुछ ख़ास था वो लम्हा जिसका गवाह था ये रेस्तोरां,
हमेशा की तरह वो दोनो बैठे थे आंखोंमें आंखें डालकर,
हाथोंमें हाथ थामकर सजा रहे थे सपना नयी दुनिया का,
जिसे पूरा करनेके के लिए रोका था ख़ुदको कुछ अरसोंसे,
अब उनका रिश्ता तबदील होने जा रहा था इक पवित्र बंधन में....

रेस्तोरांका मालिक गवाह था उनकें और ऐसे कई जोडोंका,
जिन्होंने जिन्दगीके दुसरे पड़ाव की नीव वही थी डाली,
मुस्कुराते हुए उसने दोनोंको देखा....और तभी.....

धाय धाय की आवाजसे पूरा माहोल बदल गया,
गोलियोंके बौछार से तहेलका मच गया,
हर कोई ख़ुद को और अपनोको बचाने भागने लगा,
कुछ भी सूझ नहीं रहा था,
मुस्कुराता माहौल एकदम मौत के सन्नाटे में बदल गया...
क्योंकि इन्सान, इन्सान का ही दुश्मन बन बैठा था,

हर तरफ़ लाल रंग की कालीन बिछी हुई थी,
और उसपर लगे थे इन्सानोंके अम्बार,
कोई अपनोको ढूंड रहा था, तो कोई इन्सानियत को ...


उन दोनों में से वो बची थी,
हाथोंको थमाये हुए उसके बेजान खुली आँखोंमें बस देखें जा रही था,
कुछ लम्हों पहेलेकी रंगीनिया अन्धकार में बदल चुकी थी....

रेस्तोरांके दीवार से गोलियोंके निशान तो मिट गए थे,
पर दिलोंमें आज भी ताज़ा है....

….इक अरसा बीत गया पर न भूली सकी वो उस हादसेको,
खून तो क़ब का बहना बंद हो चूका था,
लेकीन सूखे हुए जख्म अभी भी बह रहे है....नम आँखोंसे....

- सुरेश सायकर

Thursday 3 October 2013

चित्रपट : ऱ्हास आणि श्वास

जुन्या काळातील चित्रपटांमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रित ठेवून चित्रपटांची निर्मिती केली जायची. ज्यामध्ये नायक  अगदी गरीब घरातील, ज्याला रोजच्या जगण्यासाठी कष्ट पडावे अशी 
परिस्थिती परंतु त्यातून काही अदभुत आणि  नाट्यमय वळणं घेत त्याच्या आयुष्यात चांगले दिवस यायचे. चारचाकी गाड्यांमधून फिरणाऱ्या श्रीमंत घरातील मुली सोबत त्याचे प्रेमप्रकरण व्हायचे त्यातून समाजाशी आणि तिच्या श्रीमंत बापाशी लढून शेवटी गरीब घरातील नायकाचा विजय व्हायचा. जशी आजही गरिबी आहे तशीच ती तेव्हाही होती. पण चित्रपटांच्या एका फुंकरने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आयुष्यात नेहमीच तजेला यायचा, आपल्यादेखील आयुष्यात सोनेरी सकाळ उगवेल याच आशेमध्ये प्रत्येकजण जगायचा. येणाऱ्या संकटाना धीरपणे चित्रपटातील नायकासारखे तोंड देण्याची ताकद खरी तर चित्रपटांमुळेच यायची. यातून अनेकांच्या जीवनात खरंच रंग भरले, चुकीच्या मार्गाने गेल्यास परिणीती काय होते याची जाणीव देखील चित्रपटांमधून दिसत असल्याने कोणीही तो मार्ग पत्करायला धजावयाचे नाही. आपल्यादेखील आयुष्यात कोणीतरी येईल आणि तीच्यावर आपण देखील नायकाप्रमाणे भरभरून प्रेम करू अशी चित्र रंगवली जायची. यामध्ये कोणत्याही  किळसवाणा वाटावा असा प्रकार जात दाखवला नव्हता. शारिरीक सुखाऐवजी फक्त प्रेम या संकल्पनेवरच संपूर्ण जीवन न्योझावर केलं जायचं.

काळ बदलला, तसे चित्रपटांचे स्वरूप देखील बदलून गेले. आता सर्वसामान्य प्रेक्षकांना समोर ठेवून कोणत्याच चित्रपटांची निर्मिती केली जात नाही.जिथे फक्त एका गाण्यासाठी विदेशी लोकेशनवर चित्रीकरण केले जात आहे तिथे सर्वसामान्याच काय तर एखादा उच्च मध्यमवर्गीय सुद्धा येत नाही. सध्या चित्रपटांची निर्मिती फक्त आणि फक्त पैसा याच एका संकल्पनेवर आधारित होती. पूर्वीसुद्धा ती होती, मान्यच आहे, मात्र  मुल्यांची आणि संस्काराची कास  न सोडता. आताशा काहीसे विकृतीकडे झुकणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. नितीमूल्यांचा ऱ्हास सर्रास होताना दिसत असून त्याकडे कानाडोळा आपण करूच शकत नाही. कारण तुम्ही कितीही नाही म्हंटला तरीही त्याचा थेट संबंध जरी तुमच्या सोबत  नाही आला तरी तो तुमच्या घरच्या एखाद्या सदस्याशी तरी नक्कीच येतो. मग अश्यावेळेस माझं  नाही ना काही वाकडं होत  अशी पुळचट भूमिका घेणे शक्य तरी आहे का?

 मल्हार...